
गडहिंग्लज :
वयात येणाऱ्या मुलांमध्ये आरोग्या संबंधित समज, गैरसमज जास्त असतात.या वयात चुकीचे पाऊल पडू नयेत म्हणून अचूक माहिती मिळविणे गरजेचे असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे समुपदेशक भगवान कुंभार यांनी सांगितली.सावित्रीबाई फुले हायस्कूल,करंबळी ता.गडहिंग्लज येथे एच.आय.व्ही./एड्स संवेदीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक जयदीप कांबळे अध्यक्षस्थानी होते.
वयात येताना होणारे बदल, एच.आय.व्ही. म्हणजे काय? एड्स म्हणजे काय? एच.आय.व्ही.च्या बाबतीत असलेले गैरसमज,एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास घ्यावयाची काळजी,ए.आर.टी.औषध प्रणाली,पालकांकडून बाळाला होणारा एचआयव्ही, एड्स ऍक्ट २०१७ याबाबतीत उपस्थित विद्यार्थ्यांना भगवान कुंभार यांनी माहिती दिली.
यावेळी शिक्षक पुजा एकल, सचिन पन्हाळकर यांच्यासह विध्यार्थी उपस्थित होते.






