
कोल्हापूर : दि.२६
स्त्री ही कुटुंबाचा कणा असून ती आरोग्यसंपन्न राहिली तर परिवार सशक्त राहण्यास मदत होईल असे उद्गगार खुपीरे ता. करवीर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर ढेकळे यांनी काढले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर अखेर चालणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार ‘ अभियानांतर्गत खुपीरे येथे आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबिरानिमित्य ते बोलत होते.अभियानांतर्गत महिलांच्या केल्या जाणाऱ्या तपासण्या, उपक्रम व सुविधांची माहिती डॉ. ढेकळे यांनी दिली. शिबिराचे उदघाटन करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या यशोदा पाटील यांच्या हस्ते झाले.कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, खुपिरेच्या सरपंच दीप्ती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मदने प्रमुख उपस्थित होते.
डॉ. वर्षा जाधव यांनी अभियानाची माहिती दिली.डॉ. मदने यांनी अभियानाची गरज पटवून सांगितली. डॉ. पाटोळे यांनी रेबीज बद्दल माहिती दिली. तर डॉ.गोरे यांनी कुटुंब नियोजन बद्दल माहिती सांगितली.
व्हायटल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज येथील डॉक्टर्स व प्रशिक्षणार्थी यांनी पथनाट्य सादर केले.
यावेळी दत्तात्रय बोरगे, किरण गणाचारी, डॉ. अमित पाटील, डॉ. सातपुते, बाळकृष्ण पाटील, नितीन भोसले, गणेश भोसले, प्रभू माने यांच्यासह खुपीरे उपकेंद्रच्या सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका,यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समुपदेशक महेश्वरी पाटील यांनी केले तर आभार डॉ. विठ्ठल पाटील यांनी मानले.






