
कोल्हापूर :
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स (सामाजिक बांधिलकी विभाग) दिनकराव शिंदे समाजकार्य विभाग,सायबर महाविद्यालय व लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशन गर्जन व सासा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी एक दिवसीय ‘ग्रीन एक्सपो’ चे आयोजन करण्यात आले. शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत नेहमी सायकल वापरत पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देणारे प्रा. युवराज मोटे यांनी व्यक्त केले.
माणसाकडे पैसा आला की त्याची भौतिक सुखाकडे व भोगवादाकडे वाटचाल चालू होते.एकंदरीतच या प्रवृत्तीमुळे शाश्वत विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. खरतर शाश्वत विकासामध्ये खुप सार्या गोष्टी समाविष्ठ असून यामध्ये पर्यावरण रक्षण व संवर्धन हा प्रमुख गाभा आहे.याचा सारासार विचार करता समाजातील सर्वच घटकांनी आपापल्या परीने छोट्या-मोठ्या कृतीतून या ध्येयाप्रती वाटचाल करणे अभिप्रेत असल्याचेही प्रा. मोटे यांनी सांगितले सांगितले.
प्रास्ताविकात किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर यांनी ग्रीन एक्स्पोच्या माध्यमातून विशेषता तरुणांना ग्लोबल वॉर्मिग,शाश्वतता, पर्यावरण रक्षणाचे उपाय अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित अनुभवाला मिळावेत यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
याप्रसंगी कृतीतून पर्यावरण जपणारे उद्योगपती अविनाश शिरगावकर, स्वच्छता दूत म्हणून काम करणारे श्री अमित देशपांडे यांचा सायबर चे संचालक डॉ. आर.के. टेलर यांच्या हस्ते बांबूपासून बनविलेल्या शाल देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ.दीपक भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करुन भविष्यात असे विविध उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ सोनिया राजपूत, डॉ. टी.व्ही. जी.शर्मा,डॉ. पंकज कुमार दास यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
विनायक देसाई यांनी आभार मानले. मुक्ता देसाई यांनी सुत्रसंचालन केले.
या प्रदर्शनात २५ स्टॉल्सधारकांनी आपला सहभाग दर्शविला. प्रामुख्याने स्वयंसिद्धा,अवनी संस्था,एकटी संस्था,गोठणे ग्राम पर्यटन, फीडबॅक फाउंडेशन व संपूर्ण अर्थ या गोव्यामधील संस्था, ग्रामपरी व हिलदारी या पाचगणी व महाबळेश्वर येथील संस्था ,नेस्ट ,इको लाईफस्टाईल सेंद्रिय खत,कागद व बेस्ट आऊट ऑफ वेस्ट पासून तयार केलेल्या वस्तू,नर्सरी, भांडी बँक, अशाप्रकारे पर्यावरण पूरक वस्तू व सेवा देणाऱ्या संस्थांचा यात सहभाग होता.
दिवसभरात सुमारे दीड लाखाच्या आसपास उलाढाल या प्रदर्शनात झाली.
याप्रसंगी पर्यावरणावर आधारित फोटो व पोस्टर प्रदर्शन मधील विजेत्यांना व सहभागी स्वयंसेवकांना झाडाचे रोप व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनात पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर,किर्लोस्कर युटिलिटी मॅनेजर जितेंद्र कुलकर्णी, मिलेट्स उत्पादक श्रीमती प्रभावळे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी सायबर चे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे, सचिव सी.ए. ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मोहन तायडे, प्रा. सुरेश आपटे ,अन्वर फकीर, रोहित तळेकर ,कोमल तावडे इत्यादींनी परिश्रम घेतले. दिवसभरात विविध संस्था पर्यावरणीय कार्यकर्ते अशा सुमारे ३ हजाराहून अधिक लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.






