
कोल्हापूर :
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळुंखे यांना यंदाचा ‘ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांचे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्रांचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्षे आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी गेली कित्येक वर्षे अनेक चळवळीमध्ये काम करून गरजू,शोषित व पिढीतांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. राष्ट्र सेवादल, एक गाव एक पाणवठा, हागणदारी मुक्ती, कुष्ठारोग निर्मूलन,व्यसनमुक्ती,देवदासी जटा जटा निर्मूलन कार्यक्रम इत्यादी बऱ्याच चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी तुरुंगावास भोगलेला आहे. बालकल्याण संकुल या संस्थेचे ते जेष्ठ विश्वस्त आहेत. गर्जन ता. करवीर येथील प्राथमिक शाळा त्यांच्या पुढाकाराने सुसज्ज झालेली आहे.शैलजा शैलजा साळोखे या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या टेबल टेनिस खेळाडू असून त्यांनी सुद्धा कोल्हापूरच्या लौकिकामध्ये भर घातलेला आहे.






