
बाचणी : दि. २८
आजच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या प्लास्टिकच्या वापरावर आळा नाही बसला तर प्रत्येकाच्या जीवनात धोका निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन किर्लोस्कर कंपनीचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी केले. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी विभागाच्या अंतर्गत लक्ष्मी फौंडेशन गर्जन ता. करवीर च्या वतीने शांती गुरुकुल बाचणी ता. कागल येथे आयोजित केलेल्या प्लास्टिक संकलन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.शांती गुरुकुल चे संस्थापक प्रा.विठ्ठल सडोलकर अध्यक्षस्थानी होते. तर लक्ष्मी फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक रुपाली सडोलकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आनंदा कुंभार,मोहन तायडे उपस्थित होते.
पुढे बोलताना आजगेकर म्हणाले, दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर वाढल्याने निसर्गाला हानी पोहचत आहेच पण कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रण मिळत आहे. प्लास्टिकचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.
विनायक देसाई म्हणाले, प्लास्टिक मुळे जमिनी प्रदूषित होऊन नापिक होण्याचा धोका आहे. शिवाय माणसामध्ये हार्मोनल्स बदल सुद्धा घडून येत आहेत.
विठ्ठल सडोलकर यांनी प्लास्टिक कमी प्रमाणात वापरणे व धोके टाळण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगून गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी तब्बल ३०० किलो प्लास्टिक जमा केल्याचे सांगितले.
प्रास्ताविक अनिता दळवी यांनी केले.
यावेळी मराठी भाषा दिन व विज्ञान दिनही साजरा करण्यात आला. विठ्ठल शिंदे, तेजस्विनी निऊंगरे, मीरा शेवाळे विध्यार्थ्यांची भाषणे झाली.
यावेळी सर्वेश खराडे, महमद शेख व विध्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी तर आभार योगेश कोकरे यांनी मानले.
विजेते –
प्रथम – करण धनाजी पाटील
द्वितीय -आरुष अमर मोरे
तृतीय – ओम मच्छिंद्र सावेकर
उत्तेजनार्थ १ – अरव नितीन पाटील
उत्तेजनार्थ २ – साईश शिवाजी जाधव
उत्तेजनार्थ ३ – ओम अदिनाथ चव्हाण






