
कोल्हापूर :
कोल्हापूर येथील अमन फाउंडेशन ही सामाजिक संस्था गेली ७ ते ८ वर्षे स्वमग्न मुलांकरिता कार्य करत आलेली आहे. स्व मग्न मुले व त्यांच्या पालकांना स्वावलंबी बनविणे व मुलांमध्ये नावीन्यता वाढावी याकरिता संस्थेमार्फत ‘कृती’ हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत मुले व पालक वस्तू बनवितात.पर्यावरण पूरक व आरोग्याला हानीकारक नसलेल्या वस्तू या प्रकल्पांतर्गत बनविल्या जातात. दिवाळीमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू बनविणेचे काम गेले महिनाभर या प्रकल्पांतर्गत चालू असून, आकाश कंदील, साबण,पणत्या,उठणे इत्यादी वस्तू बनवून त्या माफक दरामध्ये ग्राहकांना पोहोचविल्या जात आहेत. या मुलांनी बनविलेल्या वस्तूंना मागणी वाढलेली असून राज्याच्या विविध भागातून संपर्क केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी कोल्हापूर या ठिकाणी वस्तू उपलब्ध असून, खरेदीसाठी 7020056225 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा दीपा शिपूरकर यांनी केलेले आहे.







