
भोगावती : दि. २६
स्व.दादासाहेब पाटील-कौलवकर यांनी भोगावती परिसराला विकासाच्या गंगे मध्ये आणले.त्यांचाच वारसा कौलवकर घराणे पुढे चालवत आहे. दादासाहेब पाटील-कौलवकर व स्व.आनंदराव पाटील कौलवकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम मी करत आलेलो असून, कौलवकर घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती रुपालीदेवी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) पक्षातून निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे उदगार भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक धैर्यशील पाटील कौलवकर यांनी काढले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौलव ता.राधानगरी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसनराव चौगले होते.
रुपालीदेवी धैर्यशील पाटील यांना कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातून नेत्यांकडे उमेदवारीची जोरदार मागणी करणार असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी मनोगतमध्ये सांगितले.
पंचायत समिती राधानगरी सभापती म्हणून रुपालीदेवी पाटील यांनी चांगले काम केलेले असून, जनतेमध्ये मिळून मिसळून काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.कसबा तारळे मतदार संघातील जनता रूपाली देवी पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असा विश्वासही धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी व्यक्त केला.
गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा.किसनराव चौगुले म्हणाले की,येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार गट) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या व माजी आमदार के. पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढविल्या जाणार असून, सध्या राज्य पातळीवर महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढविण्याचे धोरण आहे.महायुती म्हणून निवडणूक लढवायची की,स्थानिक आघाड्या केल्या जातील हे जिल्ह्याचे नेते नामदार हसनसो मुश्रीफ व माजी आमदार के.पी.पाटील ठरवतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे.
यावेळी जेष्ठ नेते संजयसिंह कलिकते,शंकर बाबाजी पाटील, धनाजी पाटील कोदवडे, सुवित पाटील, वसंत पाटील, पप्पू काका कुलकर्णी,विश्वास पाटील (तारळे खुर्द),संजय डोंगळे,शहाजी कवडे ,संजय पाटील पापा,भगवान देवकर, राजेंद्र पाटील,सुभाष पाटील, तानाजी ढोकरे,शहाजी पाटील,रणजीत पाटील,एकनाथ पाटील,संग्रामसिंह पाटील,युवराज पाटील, आनंदा कांबळे, बी. टी.आमते, रघुनाथ मिठारी,रघुनाथ पाटील, तुकाराम पाटील, सुनील पाटील (कुरुकली), डॉ सुभाष पाटील, विठ्ठल धोंडी पाटील, के. डी भाटले, सर्जेराव पाटील,(हळदी),शिवाजी पाटील,हरिदास मोहिते, धनाजी पाटील (पाटेकरवाडी) आदी उपस्थित होते.
स्वागत प्रा. आर. बी. पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा. निवास पाटील देवाळेकर यांनी केले.आभार डी. एन.पाटील तारळेकर यांनी मानले.





