
मुरगूड : दि. २९
अलीकडच्या काळात बदललेली जीवनशैली, ताण तणाव यामुळे हृदय रोगाचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय, मुरगुड ता. कागल या ठिकाणी 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. कोल्हापूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विदुर कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. शिबिरात २२ रुग्णाची 2D इको तपासणी करण्यात आलेली असून ६ जणांना पुढील तपासणी साठी पाठवण्यात आले.
मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैध्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कांबळे, वैध्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी घुमरे, डॉ. प्रीतम हंकारे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






