
भोगावती :
शहीद जवान स्वप्निल चरापले यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जलतरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील राजर्षी शाहू जलतरण तलावावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे, मोहन पाटील, संचालक मंडळ आणि कुरुकलीचे सरपंच रोहित पाटील, परशुराम पाटील, प्राचार्य डॉ.अरुण चव्हाण, सुधीर चरापले, फौंडेशनचे अध्यक्ष पंकज पाटील, उपाध्यक्ष सुरज चरापले, सचिव ओंकार पाटील, सदस्य अभिजित पाटील, महेश पाटील, अजय चरापले, संतोष पाटील, आशुतोष चरापले, तसेच प्रशिक्षक अजित पाटील उपस्थित होते.
या स्पर्धांमध्ये स्पर्धक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शहीद जवान स्वप्निल चरापले यांना अभिवादन केले.






