कौलव ता. राधानगरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२५- २६ करिता आगमन झाले आहे. या उपक्रमांतर्गत निशांत उराडे, जयेश तुपे, जयेश जाधव, गौरव कुमार, केशव, शिवम सायू हे कृषिदूत २४ आठवडे वास्तव्यास असतील. उपक्रमात विविध प्रकारच्या प्रगत कृषि तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होईल. माती परीक्षण , पीक संरक्षण, सेंद्रीय शेती, पाणी व्यवस्थापन, किडरोग नियंत्रण,आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, बाजारभाव, जनावरांची काळजी व संगोपन यांचा समावेश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे व डॉ. जे. एस. पाचपुते, कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. बी. सावंत व इतर विषय तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आगमनानंतर कृषीदूतांनी ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी उपसरपंच सरिता शहाजी पाटिल,सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. उपसरपंच सरिता शहाजी पाटिल व सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.






