
कोल्हापूर दि. १७ :
किर्लोस्कर ऑइल इंजिन कोल्हापूर,सायबर महाविद्यालय कोल्हापूर, साउथ एशिया डेव्हलपमेंट एजन्सी आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशन गर्जन ता. करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत सायबर कोल्हापूर येथे ‘ग्रीन एक्सपो’ अंतर्गत पर्यावरणीय शाश्वता या विषयावर प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे किर्लोस्कर ऑईल इंजिन्स चे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, सायबर समाजकार्य विभागाचे प्रा. डॉ. दीपक भोसले, डॉ. पंकज दास, व लक्ष्मी फौंडेशन, गर्जनचे विनायक देसाई यांनी कळविलेले आहे.
या प्रदर्शनात पर्यावरणीय वस्तू तयार केलेल्या संस्था सहभागी होत असून संस्थानी बनविलेल्या पर्यावारणीय वस्तू, उपकरणांचे प्रदर्शन व वस्तू खरेदी साठी उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ व्क्तींचे मार्गदर्शन असणार उपलब्ध असून सोबत खाद्यपदार्थांचे स्टॉल ही लावण्यात येणार आहेत.महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी पर्यावरणीय फोटो व पोस्टर स्पर्धेचे आयोजनही करण्यात आलेले आहे.
प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना पर्यावरणीय शाश्वतता कृती मधून अनुभवता येणार असल्यामुळे या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.






