
बाचणी : दि. 5,
बाचणी ता. कागल व वडकशिवाले ता. करवीर या कागल व करवीर तालुक्यातील गावांना जोडणारा बंधारा बाचणी येथे दुधगंगा नदीवर आहे. इंग्रज कालीन असलेला हा पुल फार जुना असल्यामुळे शेजारीच नवीन पुलाचे बांधकाम कित्येक महिने झाली पुर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान बाचणी येथील जुन्या पुलावरुन वाहतूक चालू आहे.या पुलावर प्रचंड मोठे व खोल खड्डे पडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बाचणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे मोठी बाजारपेठ व 5-6 मोठया विध्यार्थी संख्येच्या शाळा आहेत. शाळेच्या स्कूल बसना विध्यार्थी वाहतूक सुद्धा याचा बंधाऱ्यावरुन करावी लागत आहे.शिवाय कोल्हापूरला जाणारे विध्यार्थी, नोकरदार, नागरिक यांचीही संख्या मोठी आहे.कोणताही अनर्थ घडण्याच्या आत खड्डे ताबडतोब बुजवीने आवश्यक असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने यामध्ये लक्ष घालणे अत्यावशक आहे.






