
कोल्हापूर : दि. 4
12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एड्स मुक्तीचे विविध कार्यक्रम राबविले जातात. जिल्हा नियंत्रण व प्रतिबंध पथक (दिशा) सी. पी.आर. हॉस्पिटल, कोल्हापूर मार्फत या दिनाचे औचित्य व गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एड्स जनजागृती बाईक रॅली संपन्न झाली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी नेतृत्व केलेले या बाईक रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.दसरा चौक- खानविलकर पंप – भगवा चौक बावडा -शुगर मिल चौक ते सर्किट हाऊस-ताराराणी चौक -सीबीएस स्टँड ते परत सीपीआर या मार्गावर रॅली संपन्न झाली.
एड्स मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. एड्स मुक्तीसाठी आरोग्याचा श्री गणेशा महत्त्वाचा असून एड्स नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यासाठी सतत कार्यरत असल्याचे डॉ.सरिता थोरात यांनी सांगितले. बाईकस्वारांनी हातात धरलेले घोषवाक्य फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
यावेळी क्लस्टर प्रोग्रॅम ऑफिसर रमेश वर्धन, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, मकरंद चौधरी,विनायक देसाई, संदीप पाटील, कपिल मुळे,अभिजीत रोटे,सतीश पाटील,राजेश गोदडे, शुभम पाटील,दीपक सावंत, संजय गायकवाड,चंद्रकांत गायकवाड, भगवान कुंभार,जयवंत सावंत,उदय किल्लेदार,गीता निंबाळकर, महेश्वरी पाटील,सुजाता पाटील, साईनाथ माने,रिजवान पटेल,संदीप तकडे,पल्लवी देशपांडे,मनीषा जाधव,शिल्पा अष्टेकर, यांचेसह एड्स नियंत्रण कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.







