
चंदगड : दि. 03
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत राज्यभर ‘आरोग्याचा श्रीगणेशा ‘ या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जोहेब मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड येथील श्री साई गणेशोत्सव मंडळ व उत्कर्षराजा गणेश मंडळ या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले.
या शिबिरामध्ये सर्वारोग निदान तपासणी, विविध रक्त चाचण्या तपासणी, डोळे तपासणी करण्यात आली. गावातील प्रौढ व वयस्कर व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हासूरे, डॉ. देवराज सुतार, डॉ. पल्लवी निंबाळकर, डॉ. योगेश पवार, नेत्र चिकित्सा अधिकारी रेश्मा पाटील, आधीपरिचारक देसाई चंद्रकांत देसाई, परिचारिका कांबळे, संध्या पाटील यांनी तपासण्या केल्या.






