कोल्हापूर, प्रतिनिधी दि. 30,
कॅन्सरचे रुग्ण सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॅन्सर म्हणजे मृत्यू आणि कुटुंबाचे आर्थिक शोषण असा समज सर्वत्र पसरलेला आहे. पण अत्याधुनिक उपचार पद्धती योग्य वेळी निदान आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा योग्य सल्ला व मार्गदर्शन यामुळे कॅन्सर आटोक्यात येऊ शकतो,अथवा कॅन्सर रुग्णाचे आयुर्मान वाढू शकते.
राज्यातील कॅन्सर विश्वामध्ये सध्या डॉ. निलेश धामणे हे नाव आता सर्वत्र चर्चिले जाऊ लागले आहे. कॅन्सर तज्ञ डॉ. निलेश धामणे अल्पावधीतच हजारो रुग्णांवर उपचार करून कॅन्सरग्रस्तांचे मसीहा बनत आहेत.एक सप्टेंबर पासून एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर,ताराबाई पार्क कोल्हापूर या ठिकाणी डॉ.निलेश धामणे रुजू होत आहेत. या नव्या अध्यायामुळे कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय उपचार कोल्हापूर मध्येच मिळणार आहेत.तल्लख चिकित्सक,समर्पित संशोधक आणि ऊर्जावान डॉक्टर म्हणून डॉ.धामणे ओळखले जात आहेत. रुग्णांशी व नातेवाईकांशी नम्र बोलणारे डॉ.धामणे हे उच्च विद्या विभूषित कॅन्सर तज्ज्ञ आहेत. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी 10 हजारांहून अधिक रुग्णावर उपचार केलेले असून,40 हजारांपेक्षा जास्त केमोथेरपी आणि 500 हून अधिक इमिनोथेरपी सेशन्स यशस्वीरित्या हाताळले आहेत. एका महिन्यात तब्बल 1000 केमोथेरपी सेशन्स करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
कोल्हापूर मध्येच जागतिक दर्जाचे उपचार मिळायला सुरुवात होणार असल्याने अनेक रुग्णांना आशेचा किरण दिसणार आहेत. शिवाय वेळ व पैसा यांची सुद्धा बचत होणार आहे.अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर,पहिला व दुसरा मजला,स्टेशन रोड,ताराराणी चौक,कावळा नाका, हॉटेल इंटरनॅशनल च्या बाजूला कोल्हापूर, 7507803191/7738245698 या ठिकाणी संपर्क साधण्याचे कळविण्यात आलेले आहे







