मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार: पिंपळगाव बुद्रुक येथील प्रदीप पाटील गटाचा मुश्रीफ गटात प्रवेश
कागल, दि. २८
कोणत्या गावातून किती मताधिक्य मिळाले याचा विचार न करता कागल मतदार संघ हा विकासाचे माँडेल म्हणून देशात नावारूपाला यावा या हेतूनेच मतदार संघात विकासाची गंगा आणली आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पिंपळगाव बुद्रुक (ता कागल) येथील माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी शरदचंद्र पवार गटाचे नेते समरजित घाटगे गटाला रामराम करून मंञी हसन मुश्रीफ यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी मंञी मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलिस पाटील बापुसाहेब पाटील होते.
पाटील गटाच्या प्रवेशाने पक्षाला आणखी उभारी आली असल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ म्हणाले, आगामी काळात प्रदीप पाटील यांना पदे देवून योग्य तो सन्मान करु मिलिंद माने यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक रवींद्र पाटील,स्नेहल पाटील, रघुनाथ माने,बाळासाहेब मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच बंडेराव सुर्यवंशी,शंकर पाटील, विनोद माने,तुकाराम येरुडकर, हिंदूराव सुर्यवंशी, आनंदा चौगुले, पंडित सुर्यवंशी आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांनी आभार मानले.
पिंपळगावकर आता तरी मताधिक्य देणार का ?
पिंपळगावकर हे तब्बल ५० वर्षे घाटगे गटाला पाठबळ देत आले. पण आपण दुस्वास न करता या गावात इतर गावांपेक्षाही अधिक विकासकामे केली. त्यामुळे आगामी काळात तरी पिंपळगावकरांनी कार्यपद्धतीचे मुल्यमापन करून आम्हाला झुकते माप द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्य तत्परतेची शिदोरी…
आपण असेच पुढारी झालो नसल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ म्हणाले,कै. ज्ञानदेव पाटील आणि आपण १९७५ पासून समाजकारणात कार्यकरत झालो. तब्बल ५० वर्षे लोकांच्या सहवासात खर्ची घातली. त्याची परतफेड म्हणूनच मतदार संघातील जनतेने ३५ वर्षे विधानसभेत आणि ९ वेळा मंत्रीपदाची संधी प्राप्त करून दिली. अशी कृतज्ञताही मंञी मुश्रीफ यांनी व्यक्त केली.







