
चंदगड :
२१ जून जागतिक योग दिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड व आरोग्य विभाग पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रश्मी माळगावकर प्रमुख उपस्थित होत्या.यावेळी योग प्रशिक्षक दीपक नाईक यांनी योगा प्रशिक्षण दिले.
. प्रारंभी डॉ.रश्मी माळगावकर यांच्या हस्ते धन्वंतरी पुजन करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश देसाई, डॉ.सुनील हासुरे, डॉ. स्नेहल हासुरे,आरोग्य निरीक्षक वसंत गायकवाड,समुपदेशक विनायक देसाई, औषध निर्माण अधिकारी आदिनाथ वागदकर, प्रदीप कांबळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





