
विविध विषयांनी चर्चेत आलेल्या व प्रशासक लागलेल्या गोकुळ दुध संघाचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झालेला आहे. सभासद दुध संस्था मतदान प्रतिनिधी म्हणून संस्थेचा ठराव पाठविण्यासाठी २६ मे ते १ जून अखेर ठराव नमुना व पत्र पाठविले जाणार असून, संस्थानी २ जून ते १ जुलै २०२६ अखेर संस्था प्रतिनिधीच्या नावाचा ठराव निबंधक कार्यालयात पोहच करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
येत्या महिन्यात गोकुळ निवडणुकीची रंगीत तालीम होणार असून ज्याच्याकडे जास्त ठराव तो संभाव्य विजयी दावेदार मानला जातो.
संस्थांना एक वर्षापूर्वीच टोकन पोहच झाले असल्यामुळे ठरावधरकांना वेगळाच भाव येणार आहे.दोन वर्षे गोकुळ निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अदृश्य शक्तीला हा धक्का म्हणावा काय? हा सवाल आहे.






