
गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची आज कोल्हापूरमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच एकत्रित लढवायची, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील,आ. विनय कोरे, खा.धनंजय महाडिक,आ. अमल महाडिक, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नेते जरी एक झाले तरी मतदार काय करणार यावर खुप काही अवलंबून आहे.अदृश्य शक्ती महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील काय करणार हा सुद्धा प्रश्न आहे.





