
कोल्हापूर : दि. 25
सक्षम पिढ्या घडविण्यासाठी ज्ञान मंदिरे असलेल्या शाळा सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन लक्ष्मी फौंडेशन गर्जन चे अध्यक्ष विनायक देसाई यांनी केले. विद्या मंदिर सावंतवाडी ता. करवीर या शाळेच्या स्वागत कमानीच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सात्ताप्पा सुतार होते. नंदगाव शाळेचे मुख्याध्यापक शंकर पवार,सावंतवाडी मुख्याध्यापक संजय पाटील, अर्जुन तांदळे,अर्जुन कराड, विठ्ठल सावंत, जगननाथ सावंत, विशाल देसाई प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना विनायक देसाई म्हणाले की, मुलांवर चांगले संस्कार होऊन भविष्यातील सक्षम पिढ्या घडविण्यासाठी शैक्षणिक दर्जा चांगला असणे गरजेचे आहे.यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ग्रामस्थ्यांचे पाठबळ शिक्षकांना असेल तर शाळेमध्ये बदल होऊन संस्कारशील पिढ्या घडविण्यासाठी शिक्षक नेहमीच अग्रेसर राहत असतात.सावंतवाडी सारख्या छोट्याशा गावातील गावकऱ्यांनी मराठी शाळेच्या शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शाळेमध्ये बदल घडवून आणला ही कौतुकाची बाब असून, एक ज्ञानमंदिर उभे करण्याचे पवित्र काम शिक्षक व ग्रामस्थांनी केले असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
केंद्रप्रमुख साताप्पा सुतार म्हणाले, सावंतवाडी गावाने शैक्षणिक उठाव घडवून आणलेला आहे. मराठी शाळा टिकून रहाणे अत्यंत गरजेचे असून, मराठी शाळा टिकल्या तरच पुढील पिढ्या शिकतील.या राज्यातील अधिकारी, कर्मचारी हे मराठी शाळेत शिकूनच यशस्वी झालेले आहेत.मराठी शाळा शिक्षणासोबत संस्कृती व संस्कार देण्याचे कार्य करत असतात.युवकांनी स्पर्धेच्या आजच्या स्पर्धेच्या युगात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवे हे ठरविले पाहिजे.
अर्जुन तांदळे यांनी सावंतवाडी शाळेत झालेल्या शैक्षणिक उठावाची माहिती सांगून गावाने यासाठी पाठबळ दिल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक संजय पाटील यांनी प्रस्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला.
सहाय्यक शिक्षक दीपक दगडखैर यांनी शाळेच्या प्रगतीत ग्रामस्थ्यांसह देणगीदारांचे योगदान असल्याचे सांगून, गाव एकत्र आले तर काय बदल होऊ शकतो याची माहिती सांगितली.
शंकर पवार,अर्जुन कराड, विशाल देसाई, जगननाथ सावंत यांची भाषणे झाली.
यावेळी बाबासाहेब डोंगरे,बाळासाहेब गोरे,उत्तम पाटील,भिकाजी देसाई,विशाल देसाई,किरण चव्हाण,विशाल कांबळे
उपसरपंच मनीषा सावंत,अभिजीत सावंत,धनाजी सावंत,वसंत सावंत,राजाराम सावंत,महादेव सावंत,मोहन सावंत, संजय सावंत, गणेश सावंत,परसू सावंत, सदाशिव सावंत,सर्जेराव सावंत, धनाजी सावंत इत्यादी उपस्थित होते. स्वागत संजय पाटील यांनी केले व आभार उत्तम सावंत यांनी मानले.





