
नाशिक :
राज्यामध्ये गेले 20 ते 25 वर्षे एड्स नियंत्रण कर्मचारी एड्स मुक्त भारत करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.या कर्मचाऱ्यांच्या खूप व्यथा आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची गरज आहे.या कर्मचाऱ्यांमुळेच एचआयव्ही संसर्ग आटोक्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन अशी ग्वाही नाशिक विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी दिली. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना, नाशिक कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘आमदार’ पदी निवड झाल्याबद्दल आ. गीते यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
उपस्थितांच्या वतीने राज्यातील एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी मांडण्यात आल्या यावेळी अरविंद क्षीरसागर, नितीन परदेशी, विलास बोडके,राजेश मिश्रा,सुनील गीते,रुपाली क्षीरसागर, ज्योती सरोदे, योगेश, प्रवीण शिंदे, राहुल बेलेकर,तन्वीर मन्सुरी इत्यादी उपस्थित होते.






