
धाराशिव,शास्त्री नगर, दि. ९
कल्याण-डोंबिवली येथील रुग्णालयामध्ये कर्तव्य बजावत असताना परिचारिका, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ७ जुलै रोजी झालेली अमानुष मारहाण व गैरवर्तनाच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने धाराशिव येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील सेवा असतानाही अशा प्रकारे आरोग्य रक्षकांवर होणारे हल्ले अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारे आहेत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अशा भ्याड हल्ल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
यावेळी रुग्णसेवा सुरळीत ठेवून रुग्णांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात आली.
घटनेतील दोषींवर तत्काळर कारवाई करावी,आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांना अजामीनपात्र गुन्हा घोषित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात,राज्यातील सर्व शासकीय,रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करावी, शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी स्वतंत्र SOP (स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) लागू करण्यात यावी,अशा घटनांमध्ये संबंधित प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर प्रशासकीय कारवाई व्हावी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यस्तरीय प्रभावी धोरण तातडीने जाहीर करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.शासनाने या निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात आंदोलनाचे पाऊल उचलले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात डॉ.मधुकर सुर्यवंशी,डॉ.संजय नलावडे,डॉ.अस्मिता वाघमारे,डॉ.दिग्विजय दापके,
डॉ.टिके रेखा,डॉ.निलोफर मुसाफरखान,डॉ.तहेमिनबानू अब्दुल शातरी,डॉ.सचिन सुतार, डॉ.धुमाळ,निवासी डॉ.अक्षता तेली,डॉ.कोमल शितोळे,अविनाश झारखंडे,तेजस शिंदे,अनिशा वर्धमान,पांडुरंग सानप,पल्लवी चव्हाण ,रेबिका भंडारे,मंगेश सुरवसे,अभिजित झाडे,कोंडाबाई मराठे,निर्मला भालेराव,सविता भालेराव,श्रीमती गवळी, अधिपरिचारिका गिरीजा परसे,चेतना तागडे,रेखा जाधव,संगीता डावखरे,अरस्ताज तांबोळी,अश्विनी सोमासे, दिपाली डफळे,सलमा सय्यद,रुपाली जाधव, दिपक माळी, श्रीम पठाण, शबाना राशीदखान, बांगर अश्विनी बांगर ,माधुरी बोरगावकर, स्वाती सुरवसेअश्विनी बनसोडे ,मोनिका शिंदे, माधुरी जाधव,क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी मनियार,लिंगराज मस्के, औषध निर्माण अधिकारी अश्विनी झुंजारे , पुजा केसरकर,पुजा किनगावकर, कक्षसेवक प्रदिप बनसोडे,विशाल मोरे,उमेश बनगैय्या,दत्तात्रय रसाळ,अमोल पवार,मृणाल देशपांडे,अविनाश मुळूक,अनुसया ढोणे,जीवन मदाळे,विश्वनाथ लगडे,अरुणा कांबळे,रेश्मा कुंभार,राजनंदिनी सुर्यवंशी,निहाल तांबोळी,भाऊसाहेब भिसे,श्रीमती चव्हाण,श्रीमती खुने,श्रीमती इंगळे,रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका संघटनांचे पदाधिकारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि समुपदेशक संतोष कुंभार सहभागी झाले होते.






